आधी मैत्री मग प्रेम आणि लग्न! फुल्ल टू फिल्मी आहे केएल राहुल आणि अथिया शेट्टीची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 01:57 PM2023-11-05T13:57:01+5:302023-11-05T14:14:46+5:30

आज अथियाच्या वाढदिवसाबद्दल दोघांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली ते जाणून घेऊया.

अथिया शेट्टी आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. फिल्मी जगतात अथिया फारशी यश मिळवू शकली नाही. पण प्रेमात मात्र ती जिंकली.

अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया आणि क्रिकेटर केएल राहुल यांनी काही वर्ष एकमेंकाना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

अथियाने भारताचा स्टार क्रिकेटर के.एल राहुलशी 23 जानेवारी 2023 रोजी कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये लग्न केलं.

या दोघांचे लग्न सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर झाले होते.

अभिनेता केएल राहुल आणि अथियाची ओळख त्यांच्या कॉमन फ्रेंडच्यामध्यमातून झाली होती, असे म्हटले जाते.

त्यानंतर दोघांची मैत्री सुरू झाली आणि नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांना सुरुवातीला त्यांचे नाते मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.

रिलेशनशिपमध्ये असूनही, दोघेही जवळपास दीड वर्ष एकमेकांसोबत कधीही दिसले नाहीत, दोघांनी कधीही एकत्र फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले नाहीत.

2021 मध्ये अथियाच्या वाढदिवसाला त्यांच्या नात्याचा अधिकृत खुलासा झाला होता. केएल राहुलने अथिया शेट्टीसोबतचे फोटो शेअर करत 'हॅपी बर्थडे माय लव्ह' असं लिहित पोस्ट केली होती.

यानंतर अथिया आणि केएल राहुल अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसले. कधी अथिया मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली तर कधी सुट्टीत दोघेही एकमेकांसोबत स्पॉट झाले.

लग्नानंतर अथिया शेट्टी आणि केएल हे नेहमीच कपल गोल्स देताना दिसतात.