PHOTOS : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरूण कदम यांच्या लेकीला पाहिलंत का? दिसते फारच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 08:00 AM2022-09-07T08:00:00+5:302022-09-07T10:04:42+5:30

Marathi Actor Arun Kadam's Daughter Sukanya : अरूण कदम यांच्या पत्नीचं नाव वैशाली कदम आहे. या दाम्पत्याला सुकन्या नावाची एक मुलगी आहे. सुकन्याचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या धम्माल विनोदी कार्यक्रमाचं नाव घेतलं तरी काही चेहरे डोळ्यांपुढे येतात. यातलाच एक चेहरा म्हणजे, अभिनेते अरूण कदम.

अरूण कदम यांचे आगरी भाषेतील विनोद प्रेक्षकांना खळखळून हसवतात. पण आज याच अरूण कदम यांच्याबद्दल नाही तर त्यांच्या गुणी लेकीबद्दल सांगणार आहोत.

अरूण कदम यांच्या पत्नीचं नाव वैशाली कदम आहे. या दाम्पत्याला सुकन्या नावाची एक मुलगी आहे. सुकन्याचा काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं.

सुकन्या ही कमालीची सुंदर आहे. सोशल मीडियावरही प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. वडिलांसोबतचे तिचे भन्नाट रील्स ती शेअर करत असते.

मुळात सुकना ग्राफिक्स डिझाईनर आहे. कमर्शिअल आर्टिस्ट आहे. शिवाय भरतनाट्यम डान्सर आहे. मॉडेल अशीही तिची ओळख आहे.

सुकन्याने काही महिन्यांआधी सागर पोवळेसोबत लग्नगाठ बांधली. अरूण कदम यांचा जावई बिअर क्षेत्रात हेड ब्रिवर म्हणून कार्यरत आहे.

सुकन्या व तिच्या वडिलांचं बॉन्डिंग फारच भारी आहे. दोघंही मजेशीर रिल्स बनवून चाहत्यांना सतत हसवत असतात.

अरूण कदम, त्यांची पत्नी वैशाली आणि लेक सुकन्या या त्रिकोणी कुटुंबाची धम्माल पाहत नेटकरी बराच काळ त्यांच्या सोशल अकाऊंटवर घालवतात.

गेल्या दोन दशकांपासून वेगवेगळ्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणा-या अरूण कदम यांना ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या शोने नवी ओळख दिली. यानंतर अनेक कॉमेडी शोमध्ये ते दिसले.

आगरी भाषेवर विशेष प्रभुत्व असलेल्या अरूण कदमांच्या तोंडून आगरी भाषा ऐकायला जाम भारी वाटते. केवळ कॉमेडी शो नाही तर अनेक मराठी सिनेमा आणि मराठी मालिकांमध्ये सुद्धा कामे केली आहेत.