बार्बी गर्ल! हास्यजत्रेतील शिवाली परबचा ग्लॅमरस लूक; फोटोंची होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 18:21 IST2025-02-22T18:11:40+5:302025-02-22T18:21:12+5:30
शिवाली परबचा मनमोहक लूक, फोटो व्हायरल.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री शिवाली परब. या शोमुळे ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
'कल्याणची चुलबुली' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.
अभिनेत्री शिवाली परब सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
नेहमी हास्यजत्रेतील कलाकारांबरोबरचे तसेच तिचे स्वत: चे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतेच सोशल मीडियावर तिने हटके फोटो पोस्ट केले आहेत.
शिवालीचं हे फोटोशूट खूप चर्चेत आहे.
या फोटोंमधील तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना अक्षरशः घायाळ केलं आहे.