'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचा कधीही न पाहिलेला ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:15 IST2024-12-27T12:53:56+5:302024-12-27T13:15:57+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोमधूनच अनेक नवोदित कलाकारांनाही संधी मिळाली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे रसिका वेंगुर्लेकर.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोमधूनच अनेक नवोदित कलाकारांनाही संधी मिळाली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे रसिका वेंगुर्लेकर.

उत्तम अभिनय आणि विनोदाची सांगड घालत रसिका प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करते. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

नुकतंच तिने खास फोटोशूट केलं आहे. यामध्ये रसिकाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.

रसिकाने लाल रंगाचा गाऊन परिधान केला आहे. फोटोसाठी तिने खास पोझही दिल्या आहेत.

रसिकाचा हा कधीही न पाहिलेला अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रसिकाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

रसिकाने अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी', 'फ्रेशर्स' या मालिकांमध्ये ती दिसली होती.

रसिकाने मराठीबरोबरच काही हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. 'बाकरवडी' या मालिकेत ती झळकली होती.