"१०४ डिग्री ताप, डोळे लाल झालेले अन्...", शिवालीने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली- हॉस्पिटलला नेलं तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 01:09 PM2024-01-04T13:09:27+5:302024-01-04T13:16:14+5:30

शिवालीने हास्यजत्रेचं शूट करताना घडलेला एक प्रसंगही सांगतिला. अंगात १०४ डिग्री ताप असताना शूट केल्याचा खुलासा शिवालीने केला.

कल्याणची चुलबुली अशी ओळख मिळवलेली शिवाली परब 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रसद्धीझोतात आली. विनोदाचं अचूक टायमिंग साधत शिवाली प्रेक्षकांना खळखळवून हसवते.

याबरोबरच शिवालीने हास्यजत्रेचं शूट करताना घडलेला एक प्रसंगही सांगतिला. अंगात १०४ डिग्री ताप असताना शूट केल्याचा खुलासा शिवालीने केला.

मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या शिवालीने कलाविश्वात स्वत:ची ओळख निर्माण केली. संपूर्ण स्वराजला दिलेल्या मुलाखतीत शिवालीने तिच्या घरच्या परिस्थितीबद्दल भाष्य केलं.

ती म्हणाली, "मला नुकताच डेंग्यू झाला होता. तेव्हा मी पुणे, गडचिरोली, दिल्ली असा चार दिवसांचा प्रवास करुन हास्यजत्रेच्या शूटिंगसाठी आले होते."

"दिल्लीवरुन आले तेव्हाच सकाळी मला ताप आला होता. अंग थरथरत होतं तरीदेखील मी शूटिंगसाठी गेले होते. संध्याकाळी मी घरी गेल्यानंतर डॉक्टरकडून औषध घेतलं. एक दिवस मला बरं वाटलं."

"दुसऱ्या दिवशी पुन्हा ७ वाजता सेटवर शूटिंगसाठी गेले. मला १२ वाजताच्या दरम्यान थंडी भरायला लागली. मला माहीत नाही काय होतंय. सगळे मला बघायला आले होते."

"समीरदादा बर्फाच्या पाण्याने अंग पुसत होता. नमाताई पाठ पुसत होती. डोक्यावर पट्ट्या घालत होते."

"तेव्हा मला १०४ ताप होता. अंगात ताकद नव्हती, थरथरत होते. डोळे पाणावले होते. चार दिवसांनी एपिसोड लागणार होता. त्यामुळे मी सरांना म्हटलं की मी करेन."

"अशा परिस्थितीत मी २० मिनिटांचं स्किट केलं. त्यानंतर चेंज केल्यानंतर प्रसाद दादाने मला लगेच हॉस्पिटलला नेलं. त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही. हॉस्पिटलला गेल्यानंतर समजलं की मला डेंग्यू झाला होता."

"पण, याचा स्किटवर काहीच परिणाम झाला नाही," असंही पुढे शिवालीने सांगितलं.