Photos : साज ह्यो तुझा...! शिवाली परबचं पारंपारिक वेशात खुललं सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 16:46 IST2024-11-17T16:38:40+5:302024-11-17T16:46:55+5:30

शिवाली ही उत्तम विनोदशैलीसोबतच तिच्या सौंदर्यामुळे अनेकांच्या मनावर राज्य करते.

शिवाली परबला (Shivali Parab) सध्याच्या घडीला ओळखत नाही, असा एकही व्यक्ती नाही. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून (Maharashtrachi Hasyajatra) घराघरांत पोहचली आहे.

शिवाली ही उत्तम विनोदशैलीसोबतच तिच्या सौंदर्यामुळे अनेकांच्या मनावर राज्य करते.

शिवाली ही सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. तिचे फोटो कायम ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

आताही शिवाली चर्चेत आली आहे. शिवाली परबचे नवे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.

शिवाली या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तिच्या मोहक अदांनी साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलंय.

तिने या फोटोशूटमध्ये गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. यावेळी शिवालीने कानात मोठे कानातले परिधान केले आहेत.

तिच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स देखील केल्याचं पाहायला मिळत आहे.