Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 05:35 PM2024-05-12T17:35:42+5:302024-05-12T17:51:32+5:30

Mahhi Vij : माहीने लेकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. "तारा, आज मदर्स डे, आणि मला तो पहिली क्षण आठवतो जेव्हा मी तुला पहिल्यांदा माझ्या कुशीत घेतलं होतं."

अभिनेत्री माही विजने 2019 मध्ये IVF तंत्रज्ञानाद्वारे मुलगी ताराला जन्म दिला. आज मदर्स डेच्या निमित्ताने तिने लेकीच्या जन्माच्या वेळीचा अनमोल क्षण आठवला आणि ती भावूक झाली.

माहीने लेकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. "तारा, आज मदर्स डे, आणि मला तो पहिली क्षण आठवतो जेव्हा मी तुला पहिल्यांदा माझ्या कुशीत घेतलं होतं."

"ज्या दिवशी मला पहिल्यांदा एक स्त्री, आई झाल्यासारखं वाटलं. तू एक ब्लेस्ड बेबी आहेस, माझ्या बाळा, तू सर्वत्र प्रेम पसरवत आहेस."

"जसजशी तू पुढे जातेस तसतशी मी ठीक होते. मला शब्दांत ती भावना मांडता येणार नाही अशा प्रकारे तू मला आनंद देतेस. तू जादू आहेस."

"तू NICU मध्ये असताना मला माहीत होतं की, माझी मुलगी धाडसी आणि स्पेशल आहे. आज जेव्हा मला तो दिवस आठवतो तेव्हा मला आठवतं की तुझ्या चारही बाजुला ट्यूब होत्या."

"माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण मी स्वतःला रडण्यापासून थांबवले. मी स्वत: ला सांगितलं की, तू मिळाल्यामुळे मी धन्य झाली आहे आणि मी दररोज हा आनंद साजरा करत आहे" असं माहीने म्हटलं आहे.

माहीने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, तारा ही प्रीमॅच्युअर बेबी आहे आणि तिचा जन्म आयव्हीएफ तंत्रज्ञानाने झाला आहे. अत्यंत अवघड परिस्थितीत तिचा जीव वाचला आहे.

ताराला महिनाभर माही कुशीत घेऊ शकली नाही. ती व्हेंटिलेटरवर होती. माही विज आणि जय भानुशाली यांना अनेक वर्षांनी मुलगी झाली. लेकीच्या जन्मानंतर आता ते खूप आनंदी आहेत.