तरुणींनाही लाजवेल असं तिंच सौंदर्य; वयाच्या पन्नाशीतही इतकी सुंदर दिसते भाग्यश्री SEE PHOTO By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 06:00 AM 2020-09-05T06:00:00+5:30 2020-09-05T06:00:00+5:30
'मैने प्यार किया' सिनेमा प्रदर्शित होऊन ३o वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. सिनेमात भाग्यश्री पटवर्धनने सुमनची भूमिका केली होती. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान भाग्यश्री केवळ 18 वर्षांचीच होती. आपल्या करिअरची सुरवात 'कच्ची धूप' या मालिकेतून केली होती.
भाग्यश्रीने रंगवलेली सुंदर, सौज्वळ सुमन प्रेक्षकांना भावली.
भाग्यश्रीला ‘मैंने प्यार किया’ या सिनेमाने ओळख दिली.
भाग्यश्रीने वयाच्या 19व्या वर्षी तिचा बालपणीचा मित्र हिमालय दसानीसोबत लग्न केले.
लग्नानंतर तिने सिनेसृष्टीला रामराम ठोकला.
भाग्यश्री सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ असाच आहे.
वयाच्या पन्नाशीतही तिच्या चेहऱ्यावर तेज दिसतं, तिची त्वचा अगदी टवटवीत आहे.
रुपेरी पडद्यावर तिचं फारसं दर्शन झालं नसलं तरी आपल्या या फोटोच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय.
भाग्यश्री या फोटोत खूपच सुंदर दिसतेय.
या फोटोंवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.