रोहित रॉय दिसला मंदिरा बेदीला सावरताना, या सेलिब्रेटींनी दिला राज कौशलला साश्रू नयनांनी निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 16:24 IST2021-06-30T16:16:46+5:302021-06-30T16:24:03+5:30

फिटनेस स्टार व बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मंदिरा बेदीच्या (Mandira Bedi) पतीचं निधन झाल्याची बातमी आली आणि बॉलिवूडवर शोककळा पसरली.
राज यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी मंदिराच्या घरी तिचे सांत्वन करण्यासाठी पोहोचले.
राज यांच्या निधनानंतर मंदिरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पतीला अखेरचा निरोप देताना मंदिरा ढसाढसा रडली.
पतीचे पार्थिव रूग्णवाहिकेत ठेवत असताना मंदिराला जोरजोरात रडू लागली. तिची अवस्था अनेकांना बघवत नव्हती.
मंदिराला रडताना बघून तिचा मित्र रोनित रॉयने तिला सांभाळले.
रोनितच्या गळ्यात पडून मंदिरा ओक्साबोक्सी रडत होती.
रविवारी रात्री मंदिरा, राज व मित्रांनी पार्टी केली होती. सोमवारी त्यांनी या पार्टीचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. या पार्टीत क्रिकेटर झहीर खान, सागरीका घाटगे, नेहा धुपिया, आंगद बेदी हे ही सामील होते.
पत्नी अभिनेत्री मंदीरा बेदीला यामुळे मोठा धक्का बसला आहे. राज यांच्या जाण्याने मंदीराच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दोघांचही एकमेकांवर खूप प्रेम होतं. मंदिरा आणि राज यांना दोन मुलं आहेत. तर एका मुलीला त्यांनी दत्तक घेतलं आहे.