बाबो! मानुषी छिल्लरचा थाट... रॉयल गाऊनची होतेय चर्चा, किंमत माहितेय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 19:05 IST2025-02-11T19:00:28+5:302025-02-11T19:05:15+5:30

मानुषी छिल्लर आज जणू तरुणाईची फॅशन आयकॅान बनली आहे.

'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकलेली मानुषी छिल्लर (Manushi Chillar) लूकमुळे कायम चर्चेत असते.

सौंदर्यस्पर्धांमध्ये बाजी मारल्यानंतर सिनेसृष्टीकडे वळलेली मानुषी छिल्लर आज जणू तरुणाईची फॅशन आयकॅान बनली आहे.

प्रवासासाठी घातलेला साधा लाउंज सेट असो किंवा सर्वात खास डिझायनर पीस असो, मानुषी ते स्वत:च्या पद्धतीने परिधान करत तयाला वेगळी ओळख देते.

याचीच पुन्हा एकदा याची प्रचिती आली आहे. रॉयल राजस्थान येथे ती एका कार्यक्रमात सहभागी झाली होती.

यावेळी मानुषीने २ लाख ४० हजार ( Royal Gown Dress Worth 2 Lakh 40 Thousand) रुपयांचा गाऊन घातला होता.

या गाऊनमध्ये खोलवर नेकलाइन असलेली ड्रॉप कंबर असून, कमरेखालील भागात रंगबेरंगी डिझाईन आहे.

महागड्या मिकाडो फॅब्रिकमुळे या गाऊनची किंमत सहा आकड्यांमध्ये पोहोचली आहे.