मराठी अभिनेत्याची साऊथमध्येही हवा, आयटी कंपनीतील नोकरी सोडली; पटकावले राष्ट्रीय पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:46 PM2023-11-27T12:46:56+5:302023-11-27T13:02:48+5:30

गिरीश कुलकर्णीचं फिल्मी करिअर

मराठी अभिनेता गिरीश कुलकर्णीने (Girish Kulkarni)अनेक सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मराठी, हिंदी आणि मल्याळम सिनेमांमध्येही त्याने नाव कमावले आहे. नुकतंच रजनीकांतच्या ब्लॉकबस्टर 'जेलर' मध्ये गिरीश कुलकर्णीचीही भूमिका होती.

गिरीश कुलकर्णी म्हणजे अतिशय प्रभावशाली अभिनेता. ४५ वर्षीय अभिनेत्याने कधीच या क्षेत्रात येण्याचा विचार केला नव्हता. त्याने पुण्यातून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. नंतर आयटी कंपनीत नोकरीही केली.

मात्र गिरीश आधीपासून लोकल स्टेजचा भाग होता. आयटीमध्ये नोकरी केल्यानंतर त्याने रेडियोमधून आपल्या करिअरला सुरुवात केली. नंतर त्याची मराठी सिनेमात एन्ट्री झाली आणि अशा प्रकारे इंडस्ट्रीला हा टॅलेंटेड अभिनेता मिळाला.

2006 साली आलेला 'बेधा' आणि मराठी सिनेमा 'वळू'ने त्याला ओळख मिळाली. हा सिनेमा अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचला. यानंतर प्रत्येक वर्षी त्याचे चित्रपट आले.

2009 साली आलेल्या त्याच्या 'विहीर' या मराठी सिनेमाने बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये धडक दिली. तर 'दिओल' या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. इतकंच नाही तर सिनेमाचं लेखनही त्यानेच केलं होतं. त्यामुळे दोन पुरस्कार त्याच्याच नावावर झाले.

आपल्या १७ वर्षांच्या करिअरमध्ये गिरीशने कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक भूमिका साकारल्या. तर कधी पोलिस अधिकारीही बनला. आमिर खानच्या 'दंगल' मध्येही त्याने भूमिका साकारली.

गिरीशच्या पत्नीचं नाव वृशाली कुलकर्णी आहे. तिनेही 2015 साली आलेल्या 'हायवे एक सेल्फी' या मराठी सिनेमात काम केले होते. दोघांना शर्वरी ही एकुलती एक मुलगी आहे.