कलाविश्वातील वावर कमी करुन कुटुंब सांभाळतीये मकरंद अनासपुरेची पत्नी; गाजलेल्या सिनेमांमध्ये केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 11:34 AM2022-04-08T11:34:57+5:302022-04-08T11:39:08+5:30

Makrand anaspure: कापूस कोंड्याची गोष्ट, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, सुंबरान, गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटांमध्ये या जोडीने एकत्र काम केलं.

उत्तम अभिनयशैली आणि विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे मकरंद अनासपुरे.

गाढवाचं लग्न, वास्तव, दे धक्का, खुर्चीसम्राट अशा कितीतरी वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटात त्याने काम केलं आहे.

मकरंद अनासपुरेच्या फिल्मी करिअरविषयी जरी अनेकांना माहित असलं तरीदेखील त्याच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्याची चाहत्यांनी कमालीची उत्सुकता असते.

अभिनयासोबतच मकरंद अनासपुरे नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजसेवेचं कार्य करतो. त्यामुळे त्याच्या प्रोफेशनल लाइफविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे.

मकरंदच्या पत्नीचं नाव शिल्पा अनासपुरे आहे. त्यादेखील उत्तम अभिनेत्री आहेत.

शिल्पा अनासपुरे यांनी अनेक चित्रपट, नाटकांमध्ये काम केलं आहे. मात्र, आता त्यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे.

मकरंद आणि शिल्पा यांचं लव्हमॅरेज आहे. २००० साली 'जाऊ बाई जोरात' या नाटकाच्या दरम्यान त्या दोघांची भेट झाली होती. या भेटीचं प्रेमात रुपांतर झालं आणि त्यांनी लग्न केलं.

दोघांचे हे इंटरकास्ट मॅरेज आहे. परंतु, या लग्नासाठी दोघांच्याही घरातून परवानगी होती. त्यामुळे ३० नोव्हेंबर २००१ रोजी औरंगाबाद येथे दोघांचे पारंपरिक पद्धतीने त्यांनी लग्नगाठ बांधली.

लग्नानंतरही शिल्पाने काही चित्रपटांमध्ये काम केलं. यात ५ चित्रपटांमध्ये त्यांनी मकरंदसोबत स्क्रीन शेअर केली.

कापूस कोंड्याची गोष्ट, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, सुंबरान, गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटांमध्ये या जोडीने एकत्र काम केलं.

मकरंद आणि शिल्पा अनासपुरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.