अखेर क्षितीजा झाली परबांची सून! प्रथमेशच्या लग्नातील Unseen photos आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 17:30 IST2024-02-24T17:18:34+5:302024-02-24T17:30:16+5:30

शुभमंगल सावधान!! प्रथमेश-क्षितीजाच्या लग्नाचे Unseen photos व्हायरल, पाहा त्यांचा wedding album

गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती.

प्रथमेश आणि क्षितीजाने मोठ्या थाटामाटात लग्न केलं असून या लग्नसोहळ्यासाठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.

सध्या सोशल मीडियावर प्रथमेश आणि क्षितीजा यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत.

या लग्नासाठी क्षितीजाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर, प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा डिझायनर कुर्ता आणि गडद गुलाबी रंगाचं सोवळं नेसलं होतं.

प्रथमेश आणि क्षितीजा यांच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चा रंगली आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

प्रथमेश आणि क्षितीजा यांचं प्री वेडिंग फोटोशूट सुद्धा चांगलंच चर्चेत आलं होतं.

प्रथमेश आणि क्षितीजा या जोडीने भन्नाट पोझ देत लग्नमंडपात फोटो काढले आहेत.

या जोडीचं लव्ह मॅरेज असून कुटुंबाच्या परवानगीने या जोडीने लग्नगाठ बांधली आहे.