Abhidnya bhave : तुझा अभिमान वाटतो...; कॅन्सरशी लढा देणाऱ्या पतीसाठी अभिज्ञाची खास बर्थ डे पोस्ट, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 05:17 PM 2022-05-19T17:17:54+5:30 2022-05-19T18:00:50+5:30
Abhidnya bhave : गेल्या काही महिन्यांपूर्वी पतीला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. पण यामुळे घाबरून न जाता अभिज्ञा पती मेहुलच्या पाठीशी खंबरपणे उभी राहिली. नुकताच मेहुलचा वाढदिवस झाला. अभिज्ञानं तो खास अंदाजात साजरा केला. मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे मराठी इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री. अनेक मालिकांमध्ये अभिज्ञाने नकारात्मक भूमिका साकारल्या. पण खऱ्या आयुष्यात अभिज्ञा मात्र कमालीची सकारात्मक आहे.
अभिज्ञाचा पती मेहुल सध्या कॅन्सरशी लढतोय. पण अभिज्ञा नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. नुसती उभी नाही तर त्याला कॅन्सरसारख्या आजाराशी लढण्याची हिंमत देतेय.
गेल्या काही महिन्यांपूर्वी पतीला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. पण यामुळे घाबरून न जाता अभिज्ञा पती मेहुलच्या पाठीशी खंबरपणे उभी राहिली. पतीसोबत ती सावलीसारखी उभी आहे. नुकताच मेहुलचा वाढदिवस झाला. अभिज्ञानं तो खास अंदाजात साजरा केला.
मेहुलच्या वाढदिवसाचे काही फोटो अभिज्ञाने शेअर केले आहेत. या फोटोंना तिने सुंदर कॅप्शन दिलं आहे. तुझ्यासारखा जिगरबाज माणसाला मी आजपर्यंत कधीच भेटले नाही. मला तुझा अभिमान वाटतो, असं तिने नवऱ्यासाठी लिहिलं आहे.
मेहुलची कॅन्सरची ट्रीटमेंट सुरु आहे. पण अभिज्ञा त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम ठेवण्यासाठी झटतेय. त्याच्या आयुष्यात आनंद पेरण्याचा प्रयत्न करतेय. अभिज्ञाच्या सोबतीने मेहुलही कॅन्सरला खंबीरपणे झुंज देतोय.
मेहुलच्या वाढदिवसाला अभिज्ञाच्या जीवाभावाच्या मैत्रिणीही सोबत होत्या. त्यांच्यासोबतचे फोटोही तिने शेअर केले आहेत.
कोरोनाच्या दुसºया लाटेदरम्यान 6 जानेवारी 2021 रोजी अभिज्ञा व मेहुल दोघंही लग्नबंधनात अडकले होते. लग्नानंतर काही महिन्यांनी मेहुलला कोरोनाची लागण झाली होती. त्यातून तो बरा देखील झाला होता. पण आता त्याला कॅन्सरनं गाठलं आहे.
अभिज्ञा आणि मेहुल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. मात्र कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला होता. अचानक हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यातली मैत्री पुन्हा फुलत गेली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.
अभिज्ञाप्रमाणे मेहुलचा देखील घटस्फोट झाला असल्यानं दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती. अभिनेत्री अभिज्ञा भावे खुलता कळी खुलेना आणि तुला पाहते रे या मालिकांमधून घराघरांत पोहोचली.