PHOTOS: ऐश्वर्या नारकर यांचं पाण्यात फोटोशूट, दिल्या एकापेक्षा एक हटके पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:11 IST2025-02-21T16:55:44+5:302025-02-21T17:11:56+5:30

ऐश्वर्या नारकर यांचा प्रत्येक लुक चाहत्यांच्या मनात घर करत आहे.

ऐश्वर्या नारकर या मराठी (Aishwarya Narkar) मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत.

ऐश्वर्या या आपल्या अभिनयाबरोबरच ट्रेंडिंग रील्समुळे चर्चेत असतात.

त्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहेत. त्या सातत्याने त्यांचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात.

अशातच त्यांनी पाण्यात एकापेक्षा एक हटके पोझ देत फोटोशूट केलं आहे. त्यांचं हे फोटोशूट व्हायरल झालं आहे.

पांढऱ्या रंगाच्या साडीत त्यांचं सौंदर्य अधिकचं खुललं आहे. ऐश्वर्या यांचे सौंदर्य तरूणींनाही लाजवेल असे आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी वयाची पन्नाशी कधीच ओलांडलीये, पण आजही त्या खूपच सुंदर, ग्लॅमरस दिसतात.

सौंदर्याची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐश्वर्या त्यांच्या प्रत्येक लुकने चाहत्यांना घायाळ करत आहेत. चाहतेही या फोटोंच्या प्रेमात पडले आहेत.