मराठमोळ्या भाग्यश्री मोटेच्या बिकिनी लूकची चर्चा; अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहून नेटकरी घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 17:06 IST2022-07-03T17:03:29+5:302022-07-03T17:06:34+5:30

Bhagyashree mote: सध्या भाग्यश्री तिचा व्हेकेशन काळ एन्जॉय करत असून इन्स्टाग्रामवर अनेक फोटो पोस्ट करत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मोटे. अभिनयापेक्षा भाग्यश्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.

भाग्यश्रीचा कलाविश्वात फारसा वावर नाही. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या भेटीला येत असते.

सध्या भाग्यश्री तिचा व्हेकेशन काळ एन्जॉय करत असून इन्स्टाग्रामवर अनेक फोटो पोस्ट करत आहे.

भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर तिचे अनेक फोटो शेअर केले असून तिच्या प्रत्येक फोटोची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

भाग्यश्री तिचा प्रियकर विजय पालांडे याच्यासोबत सध्या व्हेकेशनसाठी गेली आहे.

भाग्यश्री मोटेने 'काय रे रास्कला' या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. यापूर्वी ती काही मालिकांमध्ये झळकली होती.

भाग्यश्रीने 'माझ्या बायकोचा प्रियकर' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

तेलुगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातही ती झळकली आहे.