मोकळे केस, स्मित हास्य! साध्या, सोज्वळ लूकमध्ये मधुराणीने केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 05:08 PM2022-05-06T17:08:57+5:302022-05-06T17:12:27+5:30

Madhurani gokhale-prabhulkar:गेल्या काही दिवसांपासून मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय झाली आहे. त्यामुळे सातत्याने ती तिचे अपडेट्स चाहत्यांना देत आहे.

उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर.

सध्या मधुराणी आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे ती तुफान लोकप्रिय झाली आहे.

कलाविश्वाप्रमाणेच मधुराणी सोशल मीडियावरही सक्रीय असून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

गेल्या काही दिवसांपासून मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय झाली आहे. त्यामुळे सातत्याने ती तिचे अपडेट्स चाहत्यांना देत आहे.

मधुराणी अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम कवयित्रीदेखील आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती कवितांचे कार्यक्रम करत असते.

अलिकडेच मधुराणी एका कवितेच्या कार्यक्रमासाठी इंदौरला गेली होती. यावेळी तिने छान साडी नेसली होती.

मधुराणीने या इंदौर दौऱ्यातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मधुराणीने यावेळी यल्लो रंगाची छान साडी नेसली होती. तसंच त्यावर हिरव्या रंगाचा मोत्यांचा गळ्यातल्याचा सेट परिधान केला होता. या लूकला फायनल टच देण्यासाठी तिने केसही मोकळे सोडले होते.

मधुराणीच्या प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असते. त्यामुळे तिच्या या फोटोवरही नेटकरी लाइक्स व कमेंटचा पाऊस पाडत आहेत.