अभिनेत्री मानसी नाईकचा जर्मनी दौरा, फोटोंना मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 16:38 IST2024-02-27T16:31:31+5:302024-02-27T16:38:58+5:30
मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) सतत चर्चेत येत असते.

मानसी नाईक अभिनेत्री असण्यासोबत एक उत्कृष्ट नृत्यांगणा आहे. तिने मराठी मालिका आणि सिनमांत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
मानसी नाईकचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
मानसी नाईक सध्या जर्मनीमध्ये फिरायला गेली आहे.
जर्मनीध्ये सध्या अभिनेत्री वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असून सोशल मीडियावर तेथील अनेक फोटो शेअर करतेय.
मानसी नाईकने सोशल मीडियावर सुंदर फोटोशूट शेअर केले.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये जर्मनीतील सौंदर्य पाहायला मिळत आहे.
मानसी कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या अंदाजात पोझ देताना दिसते आहे.
मानसीने ओव्हर साईज शर्ट आणि जिन्स घातल्याचं दिसून येत आहे.
तिच्या फोटोंना चाहत्यांकडून पसंती मिळतेय.
मानसीच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.