रुपेरी वाळू अन् गर्द झाडी! साडी नेसून मानसी नाईकने समुद्र किनारी केलं फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 15:33 IST2024-05-29T15:28:47+5:302024-05-29T15:33:35+5:30
Mansi naik: काठापदराच्या साडीत मानसीने फोटोशूट केलं असून तिचा मराठमोळा लूक चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक (manasi naik). अभिनेत्री असण्यासोबतच ती उत्तम नृत्यांगनादेखील आहे.
सोशल मीडियावर मानसीचा दांडगा वावर आहे. त्यामुळे ती वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते.
अलिकडेच मानसीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
काठापदराच्या साडीत मानसीने फोटोशूट केलं असून तिचा मराठमोळा लूक चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
मानसीने समुद्र किनाऱ्यावर फोटोशूट केलं आहे.
कधी झाड्यांच्या गर्दीत तर कधी समुद्राच्या रुपेरी वाळूवर तिने सुरेख फोटोशूट केलं आहे.
मानसीला नवनवीन ठिकाणांना भेट द्यायला प्रचंड आवडतं. त्यामुळे ती बऱ्याचदा देशविदेशातील दौरे करत असते.
काही दिवसांपूर्वीच मानसीने सिनेमानिमित्त जर्मनी दौरा केला होता.