'नजरें मिलते ही नजरों से..'; मेघा घाडगेच्या नजरेच्या बाणाने चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 17:10 IST2023-11-14T17:07:13+5:302023-11-14T17:10:24+5:30

Megha ghadge: मेघाने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे.

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री मेघा घाडगे (Megha Ghadge) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

उत्तम अभिनयासह मेघा तिच्या ठसकेबाज लावणीमुळेही कायम प्रेक्षकांची मनं जिंकत असते.

मेघा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या भेटीला नवनवीन पोस्ट शेअर करत असते.

मेघाने यावेळी दिवाळी निमित्त खास फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटपैकी काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मेघाचे हे फोटो व्हायरल होत असून तिच्या लूकची चर्चा होत आहे.

मेघाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. सोबतच त्याला साजेसा मेकअप केला आहे.

मेघाच्या या फोटोंवर कमेंटचा पाऊस पडत आहे.

मेघाचे फोटो चाहत्यांच्या पसंतीत उतरत आहेत.