लग्न आयराचं पण चर्चा मात्र मिथिला पालकरची; ग्लॅमरस लूक ठरला चर्चेचा विषय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 17:40 IST2024-01-05T17:20:48+5:302024-01-05T17:40:36+5:30
Mithila palkar: आयरा-नुपूरच्या लग्नात मिथिलाने तिच्या ग्लॅमरस लूकमुळे सगळ्याचंं लक्ष वेधून घेतलं.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान हिने नुकतीच नुपूर शिखरे या मराठमोळ्या तरुणासोबत लग्नगाठ बांधली आहे.
या लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. बॉलिवूडच्या ग्रँड वेडिंगमध्ये दोन मराठमोळ्या कलाकारांनीही हजेरी लावली होती.
आयरा आणि नुपूरच्या लग्नात अभिनेत्री मिथिला पालकर आणि सारंग साठे या दोघांनी हजेरी लावली होती.
या लग्नसोहळ्यात मिथिलाच्या लूकची सर्वात जास्त चर्चा झाली.
मिथिलाने लाल रंगाची सुरेख डिझायनर साडी परिधान केली होती. ज्यामुळे लोकांच्या नजरा तिच्याकडेच वेधल्या होत्या.
या साडीतील काही निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
मिथिलाने या साडीला आणि तिच्या लूकला साजेसा असा मेकअप आणि हेअर स्टाइलही केली आहे.
मिथिला, नुपूरची चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे नुपूर-आयराच्या केळवणापासून ते त्यांच्या लग्नापर्यंत प्रत्येक कार्यात मिथिलाचा सहभाग होता.