आला वारा गेला वारा, ताईचा pic म्हणजे...; प्रिया बापटचे फोटो भारी, कमेंट्स तर लय भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 04:46 PM2021-10-04T16:46:29+5:302021-10-04T16:54:43+5:30

Priya Bapat : प्रिया बापटचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोबत या कमेंट्सचीही जोरदार चर्चा आहे.

अभिनेत्री प्रिया बापटचे साडीतील काही फोटो सध्या जाम चर्चेत आहेत. त्याहीपेक्षा चर्चा आहे ती या फोटोवरच्या कमेंट्सची.

होय, प्रियाने सोशल मीडियावर वेगवेगळ्या रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्रिया कमालीची सुंदर दिसतेय. गुलाबी, काळी, हिरवी, निळी, जांगळी... या साडीत तिचं सौंदर्य खुलून आलंय.

हे फोटो पाहून चाहते इतके बेभान झालेत की, या प्रियाच्या या फोटोंवर कमेंट्सचा नुसता पाऊस पडला.

अनेकांनी प्रियाच्या या फोटोंचं भरभरून कौतुक केलं. पण यातल्या दोन कमेंट्स विशेष लक्षवेधी ठरल्यात.

प्रिया बापटचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोबत या कमेंट्सचीही जोरदार चर्चा आहे.

आला वारा गेला वारा, ताईचा पिक्चर म्हणजे कोरोना सॅनिटायझरचा फवारा...., अशी मजेशीर कमेंट एका चाहत्याने केली आहे.

दुसरी एक कमेंटही खास आहे. खेळायला आवडते पत्त्यात रमी, फोटो पाहून पोर विचारतात हीच का ती संतूरवाली मम्मी...., अशी ही पोस्ट आहे.