आकाशसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आर्चीने शेअर केला नवा फोटो; नेटकऱ्यांमध्ये पुन्हा चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 18:45 IST2024-01-16T18:40:36+5:302024-01-16T18:45:23+5:30
Rinku rajguru:रिंकू आणि आकाशचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आता रिंकूने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. सैराट, कागर, मेकअप अशा कितीतरी सिनेमांतून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे या ना त्या कारणामुळे ती चर्चेत येत असते.
रिंकू गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. अलिकडेच रिंकूने अभिनेता आमिर खानच्या लेकीच्या लग्नाला हजेरी लावली होती.
आयराच्या रिसेप्शन पार्टीतील फोटो रिंकूने सोशल मीडियावर शेअर केला होता. यावेळी तिच्यासोबत आकाश ठोसर सुद्धा होता. त्यामुळे ही जोडी सध्या चर्चेत येत आहे.
रिंकू आणि आकाशचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आता रिंकूने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.
रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अत्यंत साध्या लूकमध्ये दिसून येत आहे.
रिंकूने पांढऱ्या रंगाच्या चिकनकारी वर्क असलेल्या सिंपल अशा ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
रिंकूचे हे फोटो सध्या नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे तिच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.