marathi actress Shreya Bugde shared photos of her Gudi Padwa look wore pink saree
गुलाबी साडी...! श्रेया बुगडेचा गुढीपाडवा लूक, फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 04:55 PM2024-04-09T16:55:25+5:302024-04-09T17:28:09+5:30Join usJoin usNext गुलाबी साडीत खुललं श्रेयाचं सौंदर्य! 'चला हवा येऊ द्या' लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली श्रेया बुगडे. कॉमेडीतील दिग्गजांसोबत श्रेयानेही तिचं टॅलेंट सिद्ध केलं. आता कार्यक्रम बंद झाल्याने सर्वच या कलाकरांची आठवण काढत आहेत आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्रेयानेही तिच्या घरच्या गुढीचे फोटो पोस्ट केलेत. तिने सर्व चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुलाबी साडी, गळ्यात हार, नाकात नथ, केसात जगरा असा तिचा पारंपरिक लूक आहे. यामध्ये श्रेयाचं सौंदर्य खुलून आलं आहे. तसंच या फोटोंमधून तिच्या सुंदर, आलिशान घराची झलकही पाहायला मिळत आहे. दाराशी उभं राहून काढलेला तिचा फोटो चाहत्यांना खूपच आवडलाय. तर भिंतीवर असलेली गणेशाची फ्रेमही लक्ष वेधून घेत आहे. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम आता संपला आहे. निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांनी दुसऱ्या वाहिनीवर नवा शो सुरु केला आहे. मात्र यातही श्रेया दिसणार नाही. त्यामुळे आता श्रेयाच्या नव्या प्रोजेक्ट्सची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. श्रेयाचं सोशल मीडियावरील फोटोशूट नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पडतं. तिने काही दिवसांपूर्वीच नवऱ्यासोबतचे गोवा व्हॅकेशनचे फोटो पोस्ट केले होते. या फोटोंवरही नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला होता. टॅग्स :श्रेया बुगडेगुढीपाडवामराठी अभिनेताचला हवा येऊ द्याShreya Bugdegudhi padwaMarathi ActorChala Hawa Yeu Dya