PHOTOS : सोनाली कुलकर्णीचा ‘तिसरा हनिमून’, पतीसोबत मॅक्सिकोत एन्जॉय करतेय अप्सरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 10:57 AM2022-05-13T10:57:07+5:302022-05-13T11:07:18+5:30

Sonalee Kulkarni : मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या विदेशात आपल्या पतीसोबत व्हेकेशन एन्जॉय करतेय.

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच सोनाली कुलकर्णीनं लग्नाचा पहिला वाढदिवस नुकताच झाला. या दिवशी सोनीला पती कुणाल बेनोडेकरसोबत पुन्हा एकदा विधिवत लग्नबंधनात अडकली.

सोनालीने इन्स्टाग्रामवर तिसऱ्या हनिमूनचे फोटो शेअर केले आहेत. #3rdhoneymoon असा हॅशटॅग तिने हे फोटो शेअर करताना दिला आहे. सोनाली व कुणाल सध्या मॅक्सिकोत हनिमून एन्जॉय करत आहेत.

या फोटोंना तिने स्पॅनिश भाषेतलं कॅप्शन दिलं आहे. Hola de mexicoअसं तिने लिहिलं आहे. मॅक्सिकोहून नमस्कार असा याचा अर्थ होतो. फोटोत सोनाली मोनोकिनीत मस्तपैकी पोझ देताना दिसतेय.

सोनालीने गतवर्षी 7 मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईतील एका मंदिरात लग्नगाठ बांधली होती. गेल्या 7 मेला लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनालीनं पुन्हा एकदा विधीवत लग्न केलं.

7 मे 2022 रोजी सोनाली आणि कुणालच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं. हेच औचित्य साधून त्यांनी याच दिवशी विधिवत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

सोनालीचा मेहंदी सेरेमनी आणि व्हाईट वेडिंगचा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांची तिच्या लग्नाबद्दलची उस्तुकता आणखी वाढली. पण चार दिवस उलटूनही तिच्या लग्नाचे फोटो समोर न आल्यानं चाहते थोडे नाराज झाले.

सोनालीचा नवरा कुणाल दुबईत वास्तव्याला असतो. त्याचे कुटुंबीय लंडनला वास्तव्यास असतात.

कुणालचं शिक्षण लंडनमधल्या मर्चंट्स टेलर स्कूलमध्ये झालं आहे. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स मधून त्याने उच्च शिक्षण घेतलं आहे.