सोनालीप्रमाणेच प्रचंड स्टायलिश आहे तिची आई; अगदी सेम टू सेम दिसतात 'या' मायलेकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 07:00 AM2022-07-14T07:00:00+5:302022-07-14T07:00:00+5:30

Sonalee kulkarni: सोनालीच्या आईचं नाव सावी कुलकर्णी असं असून सोनालीने तिच्या आईसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर सोनालीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

आज सोनाली मराठी कलाविश्वातील अप्सरा या नावाने ओळखली जाते.

गेल्या काही दिवसांपासून सोनाली सातत्याने चर्चेत येत आहे. गेल्या २ वर्षात तिचे लागोपाठ अनेक चित्रपट प्रदर्शित झाले.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सोनालीचा तमाशा लाइव्ह हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा आहे.

सध्या सोशल मीडियावर सोनालीच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफचीही चर्चा होत आहे. यात तिच्या आईची चर्चा रंगली आहे.

सोनाली हुबेहूब तिच्या आईसारखी दिसते. त्यामुळे या मायलेकींचे फोटो चर्तेत आले आहेत.

सोनालीच्या आईचं नाव सावी कुलकर्णी असं असून सोनालीने तिच्या आईसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

सोनाली बऱ्यापैकी तिच्या आईसारखी दिसते. अगदी त्यांचे डोळे, चेहऱ्याची ठेवण एकसारखी आहे.

सोनालीची आई सोशल मीडियावर फारशी सक्रीय नाही. मात्र, त्यांनी इन्स्टाग्रामवर काही मोजके फोटो शेअर केले आहेत.

सोनालीच्या आई-बाबांचा सुंदर फोटो