'अप्सरे'चं Stunning photoshoot; निखळ हास्यामुळे जिंकतीये नेटकऱ्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 10:36 AM2021-11-19T10:36:07+5:302021-11-19T10:48:35+5:30

Sonalee kulkarni: अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेली सोनाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे.

मराठी कलाविश्वातील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकत असते. परंतु, यावेळी ती तिच्या नव्या फोटोशूटमुळे प्रेक्षकांची मनं जिंकतांना दिसत आहे.

अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेली सोनाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिच्या जीवनातील काही घटना, प्रसंग चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सध्या सोनाली तिच्या आगामी 'झिम्मा' या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाशी संबंधित अनेक अपडेट्स तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना दिले आहेत.

सोनालीने अलिकडेच एक सुंदर फोटोशूट केलं असून त्याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सोनालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसून येत आहे.

या फोटोमध्ये सोनाली निळ्या रंगाची शेड असलेला आऊटफिट आहे. सोबतच तिच्या चेहऱ्यावरील निखळ हास्याने ती अनेकांना मोहून टाकत आहे.

सध्या सोनाली पुण्यात तिच्या आगामी 'झिम्मा' चित्रपटाचं प्रमोशन करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात तिच्यासोबत सुहास जोशी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, सिद्धार्थ चांदेकर ही कलाकार मंडळी स्क्रीन शेअर करणार आहेत.