गॅरीच्या पत्नीचा बोल्ड अंदाज; मोनोकिनीमध्ये सुखदाने केलं बिंधास्त फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 06:00 IST2022-07-23T06:00:00+5:302022-07-23T06:00:00+5:30
Sukhada khandkekar: बऱ्याचदा साडीत वावरणाऱ्या सुखदाने यावेळी चक्क मोनोकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर.
अभिजीत आणि सुखदा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी असून दोघांनीही कलाविश्वात त्यांचं स्थान निर्माण केलं आहे.
अभिजीत आणि सुखदा सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत त्यामुळे अनेकदा ते चाहत्यांसोबत त्यांच्या जीवनातील लहानसहान गोष्टी शेअर करत असतात.
मध्यंतरी ही जोडी त्यांचा क्वालिटी टाइम एकत्र घालवण्यासाठी फिरायला गेले होते. येथील काही फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
बऱ्याचदा साडीत वावरणाऱ्या सुखदाने यावेळी चक्क मोनोकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे.
सुखदाने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची बोल्ड दिसत आहे.
पहिल्यांदाच सुखदा इतक्या बोल्ड अंदाजात नेटकऱ्यांसमोर आल्यामुळे अनेक जण थक्क झाले आहेत.
अभिजीत आणि सुखदा यांच्या प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांकडून भरभरुन प्रेम मिळत असतं.