थाटामाटात पार पडलं सुरुची-पियुषचं लग्न, अभिनेत्रीच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 18:54 IST2023-12-06T18:39:30+5:302023-12-06T18:54:00+5:30
'का रे दुरावा' फेम अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे यांनी गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

'का रे दुरावा' फेम अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे यांनी गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.
सुरुचीने सोशल मीडियावर लग्नाचा फोटो शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.
लग्नासाठी सुरुचीने पिवळ्या रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक केला होता. तर पियुषही मराठमोळ्या लूकमध्ये दिसून आला.
रिसेप्शनसाठीही सुरुची आणि पियुषने साधा लूक केला होता. सुरुचीच्या पारंपरिक मंगळसूत्राने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नातेवाईक, कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सुरुची-पियुषने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पियुष रानडेचं सुरुची अडारकरसोबत हे तिसरं लग्न आहे. पियुषचं पहिलं लग्न अभिनेत्री शाल्मली टोळयेसोबत झाले होते. काही कारणास्तव ते दोघे वेगळे झाले.
त्यानंतर १ फेब्रुवारी २०१६ रोजी अभिनेत्याने मयुरी वाघसोबत दुसरे लग्न केले. 'अस्मिता' मालिकेच्या सेटवर त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न केले. मात्र हे लग्नदेखील फार काळ टिकू शकले नाही.