सोनाली कुलकर्णीचे फोटो पाहून उर्मिला मातोंडकरला राहवेना, कमेंट करत म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 04:46 PM2024-08-30T16:46:43+5:302024-08-30T17:05:00+5:30

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.

निखळ सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर सोनाली आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करते आहे.

मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने आपल्या अभिनयाने दबदबा निर्माण केला आहे.

नुकतेच सोनालीने सोशल मीडियावर तिचे काही निवडक फोटो पोस्ट केल्याचं पाहायला मिळतंय.

या फोटोंमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसते. फिकट गुलबी रंगाची साडी, केसांची वेणी बांधून त्यामध्ये तिने गुलाबाचं फुल माळलं आहे.

सोनालीचे फोटो पाहून उर्मिला मातोंडकरनेही त्यावर कमेंट केली आहे. 'So Pretty' असं म्हणत अभिनेत्रीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनयासोबतच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते.

'अगं बाई अरेच्या २', 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', 'सिंघम', 'वेल डन अब्बा', 'दिल चाहता हैं, 'प्यार तुने क्या किया', 'गुलाबजाम' अशा कितीतरी हिंदी, मराठी सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.