अभिनेत्री अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती, आयुष्यात घडला 'हा' मोठा प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 05:55 PM2024-08-05T17:55:28+5:302024-08-05T18:09:22+5:30

मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती झाली असून तिच्या चाहत्यांना यामुळे आनंद झालाय (amruta khanvilkar)

अभिनय आणि नृत्य यातून कायम प्रेक्षकांची मन जिंकणारी अष्टपैलू अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली अमृता खानविलकर.

अमृताच्या आगामी 'वर्ल्ड ऑफ स्त्री' मधून शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय संगीत आणि नृत्याची अनोखी मैफिल यातून अनुभवयाला मिळणार आहे. त्यामुळे अमृताचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

'वर्ल्ड ऑफ स्त्री'मध्ये अमृतासोबत डान्स गुरु आशिष पाटील आणि १० अफलातून नर्तकांची प्रतिभावान टीम आहे

९० मिनिटांचा अमृताचा हा लाइव्ह ऑडिओ-व्हिज्युअल परफॉर्मन्स भक्ती, सौंदर्य आणि डायनॅमिक एनर्जी (शिवशक्ती) च्या थीम्स नुसार असणार आहे.

अमृता एक अभिनेत्री म्हणून सगळ्यांना माहीत आहे, पण तिच्या नृत्याविष्काराची अनोखी बाजू 'वर्ल्ड ऑफ स्त्री'मधून अनुभवायला मिळणार आहे.

अमृताने याआधी एक कमालीचं पोस्टर तिच्या सोशल मीडिया वरून शेयर केलं होत आणि आता अमृताने 'वर्ल्ड ऑफ स्त्री 'चा टीझर लाँच केला आहे

२४ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबईत NCPA येथे वर्ल्ड ऑफ स्त्री चा प्रीमियर होणार असून प्रेक्षकांना नृत्य, संगीत आणि संस्कृतीच्या अनोख्या उत्सवात मंत्रमुग्ध होण्याची संधी मिळणार आहे.