बॉलिवूडमधील 'हा' प्रसिद्ध दिग्दर्शक आहे किशोरी शहाणेंचा नवरा; तुम्हाला माहितीये का त्यांच्याविषयी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 06:00 AM2022-03-03T06:00:00+5:302022-03-03T06:00:00+5:30

Kishori shahane : अभिनेता जॅकी श्रॉफमुळे किशोरी आणि त्यांच्या पतीची पहिली भेट झाली.

किशोरी शहाणे हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. मराठीसह हिंदी कलाविश्वातही त्यांनी आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.

वयाच्या १७ व्या वर्षी अभिनयाची सुरुवात करणाऱ्या किशोरी यांचे आजवर असंख्य चित्रपट गाजले.

‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केल आहे.

किशोरी शहाणे यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी साऱ्यांनाच माहित आहे. मात्र, आज आपण त्यांच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेणार आहोत.

लाखो जणांची क्रश असलेल्या किशोरीने यांनी हिंदी कलाविश्वातील एका प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत लग्नगाठ बांधली आहे.

अभिनेता जॅकी श्रॉफमुळे किशोरी आणि त्यांच्या पतीची पहिली भेट झाली.

दिपक बलराज विज असं त्यांच्या पतीचं नाव असून त्यांचं लव्ह मॅरेज आहे.

दिपक विज बॉलिवूडमधील नावाजलेले दिग्दर्शक आहेत.

दीपक यांच्यामुळेच किशोरींना ‘बॉम्ब ब्लास्ट’ चित्रपटातही काम करायची संधी मिळाली.

‘घर एक मंदिर’, ‘ जस्सी जैसी कोई नही’, आणि ‘सिंदूर’ या हिंदी मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

किशोरी आणि दिपक विज यांना एक मुलगा असून त्याचं नाव बॉबी आहे.