रूपानं देखणी! मेघाचं मनमोहक सौंदर्य; नवरात्री निमित्त लाल रंगाच्या साडीत खास फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 02:23 PM2023-10-17T14:23:23+5:302023-10-17T14:30:02+5:30

उत्तम अभिनयासह मेघा तिच्या ठसकेबाज लावणीमुळेही कायम प्रेक्षकांची मनं जिंकत असते.

सध्या सर्वत्र नवरात्रीची धूम दिसत आहे. देवी आईच्या आगमनाचा हा सण उत्साहाने साजरा केला जात आहे.

या दिवसांत नऊ रंगांना विशेष स्थानं दिलं जातं. सगळ्या स्त्रिया या दिवसांत प्रत्येक दिवशीच्या रंगानुसार पेहराव परिधान करतात. नऊ मानाच्या रंगांपैकी आज ‘लाल’ रंगाचा दिवस आहे.

या खास निमित्ताने बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री मेघा घाडगे हिने खास लाल रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.

लाल रंगाची साडी, पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज आणि ऑक्सडाईज दागिने असा मेघाचा लूक अगदी थक्क करणारा आहे.

मेघाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा हा लूक पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.

तिने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'आजचा रंग - लाल, उपासना - चंद्रघंटा देवीची, लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे. हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो'.

सुंदर दिसत आहेस, अती सुंदर, अप्रतिम अशा अनेक कमेंट मेघाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच तिच्या लूकचंही कौतुक केलं आहे.

मेघा ही मराठी कलाविश्वातील होतकरु आणि गुणी अभिनेत्री आहे. मेघा तिच्या लावणीमुळेही कायम चर्चेत येत असते.

मेघा घाडगे आणि लावणी एक अतूट समिरकरण आहे. मेघाने महाराष्ट्राची लावणी सातासमुद्रापार नेली. ती कायमच लावणीविषयी पोटतिडकीने बोलते.

मेघा सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. अनेकदा ती नवनवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आज तिचा मोठा चाहतावर्ग आहे.