actress Richa Pariyalli Duniyadari marathi movie fame know where is she now
'दुनियादारी' मधली दिग्याची गर्लफ्रेंड आठवतेय का?, जाणून घ्या तिचं खरं नाव By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 02:58 PM2024-06-02T14:58:33+5:302024-06-02T15:44:00+5:30Join usJoin usNext 'दुनियादारी' मधली सुरेखा आता आहे तरी कुठे? 2013 साली आलेला दुनियादारी सिनेमा सर्वांच्याच लक्षात असेल. या सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला अच्छे दिन आले होते. सिनेमाने २८ कोटींहून अधिकचा बिझनेस केला होता. सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर आधारित हा सिनेमा होता. दुनियादारीची गोष्ट, सिनेमातील गाणी, डायलॉग्स, भूमिका असं सगळंच गाजलं. पुण्यातील SP कॉलेज, कॉलेजचा कट्टा,मैत्री प्रेम, प्रेमभंग, लग्न असं सगळंच यात होतं. स्वप्नील जोशी श्रेयस तळवकरच्या भूमिकेत तर अंकुश चौधरी दिगंबर पाटील म्हणजे दिघ्याच्या भूमिकेत होता. सई ताम्हणकर शिरीन, उर्मिला कानेटकर मिनाक्षी, रिचा परियाली सुरेखा भाटेच्या भूमिकेत होती. या भूमिकांमध्ये सुरेखा भाटेची भूमिका साकारणारी रिचा परियाली सर्वांच्याच लक्षात असेल. सुरेखाने दिघ्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली. दिघ्याचा तिच्यावर अतिशय जीव असतो. त्यांची सुंदर लव्हस्टोरी सिनेमात दाखवली आहे. 'ही सुरेखाsss आपल्याला पटलेली हाय' असं स्पेशल गाणंही तिच्यासाठी सिनेमात आहे. दिघ्या आणि सुरेखाच्या प्रेमकहाणीचा शेवट मात्र दु:खद होतो. सुरेखाच्या आईवडील दिघ्याचा स्वीकार करत नाहीत आणि लेकीचं लग्न दुसरीकडे लावतात. हे दिघ्याला कळतं तेव्हा तो पूर्णपणे तुटतो. व्यसनाच्या आहारी जातो. कसं झालं, का झालं? माझ्या मर्जीने झालं की बळजबरीने हे आता महत्वाचं नाहीए. जे व्हायचं ते होऊन गेलं. आता फक्त एकच विनंती मला विसरुन जा....माझं ऐकशील ना दिघ्या? सुरेखाचा सिनेमातला हा डायलॉग प्रचंड गाजला. ही सुरेखा म्हणजेच रिचा परियाली बऱ्याच काळापासून सिनेसृष्टीपासून गायब आहे. ती सोशल मीडियावरही नाही. 2013 साली दुनियादारी आल्यानंतर ती पुन्हा कुठेच दिसली नाही. 2016 साली रिचाने रौनक शाहसोबत लग्नगाठ बांधली. दुनियादारीला १० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या वर्षी 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात दुनियादारी स्पेशल एपिसोड होता. यामध्ये कलाकारांनी हजेरी लावली होती. तेव्हा रिचाचीही झलक पाहायला मिळाली होती.टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीमराठी चित्रपटMarathi ActorCelebrityMarathi Movie