Actress shruti marathe married to actor ghatnekar
Happy Birthday Shruti Marathe : श्रुती मराठेचा साऊथ इंडस्ट्रीतही आहे बोलबाला, 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची आहे ती पत्नी.... By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 10:55 AM2020-10-09T10:55:34+5:302020-10-09T11:53:24+5:30Join usJoin usNext श्रुती मराठेने 2009 मध्ये आलेल्या 'सनई चौघडे' सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण केले. तर इंदिरा विजहा या सिनेमातून तिने साऊथमध्ये एंट्री घेतली. श्रुती आज तिचा वाढदिवस साजरा करते आहे. (Photo Instagram) श्रुतीने असा मी तसा मी, लागली पैज सत्या, सावित्री आणि सत्यवान, रामा माधव आणि तुझी माझी लव्हस्टोरी अशा अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. सिनेमांसोबत श्रुती छोट्या पडद्यावर ही झळकली आहे. (Photo Instagram) अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रुतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. (Photo Instagram) अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. (Photo Instagram) अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. श्रृतीने साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिकांना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे. (Photo Instagram) श्रुतीचा पतीदेखील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केले आहे.(Photo Instagram) श्रुती पती गौरवसोबतचे फोटो अनेकवेळा सोशल मीडियावर शेअर करत असते. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. Photo Instagram) श्रुती आणि गौरवची ओळख 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. (Photo Instagram) गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे. छोट्या पडद्यावरील ‘तुज विन सख्या रे’ या मालिकेतून गौरव घराघरांत पोहोचला होता. (Photo Instagram) मराठी सिनेमा आणि हिंदी मालिकांबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतूनही त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. श्रुती गौरवसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Instagram)टॅग्स :श्रुती मराठेगौरव घाटणेकरShruti MaratheGaurav Ghatnekar