अभिनेत्री सोनाली कुलकर्णी फिरतेय जपान, शेअर केले सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:11 IST2025-04-02T17:01:38+5:302025-04-02T17:11:32+5:30

मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या जगभरातील देशांमध्ये फिरताना दिसत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीची लोकप्रिय अभिनेत्री आणि लाखो दिलांची धडकन असणारी सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतेय

सोनालीला विविध ठिकाणी फिरण्याची आवड आहे, विशेषकरुन ती भारताबाहेरील अनेक देशात भटकंती करत असते.

सध्या सोनाली जपान (Sonalee Kulkarni In Japan) हा देश फिरतेय. तेथील सुंदर फोटो तिनं सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

या फोटोत सोनाली जपानमधील आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेताना दिसतेय.

सोनाली नेहमीच तिच्या फोटोंना हटके कॅप्शन देत सर्वांचे लक्ष वेधून घेते.

सोनालीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंना "Sakura Sakura….Swipe to see Puraaa" असे कॅप्शन दिले आहे.

सोनालीनं जपानमधील लोकप्रिय फूल 'साकुरा'चे फोटो शेअर केलेत.

जपानमध्ये चेरी ब्लॉसमला 'साकुरा' म्हणतात. तेथे हे फूल खूप लोकप्रिय आहे.

सोनालीच्या या फोटोवर नेटकरी आणि चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.

अभिनेत्री लवकरच 'महाराणी ताराराणी' आणि 'रावसाहेब' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.