अलका कुबल यांनी कुटुंबासोबत साजरी केली दिवाळी, पाहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 11:31 AM2022-10-25T11:31:11+5:302022-10-25T11:35:14+5:30

Alka Kubal : अलका कुबल यांनी सोशल मीडियावर कुटुंबासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनी रुपेरी पडद्यावर सून, लेक अशा व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

अलका कुबल सोशल मीडियावर सक्रीय असून त्या फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.

दरम्यान आता त्यांनी दिवाळीच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अलका कुबल यांनी इंस्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, शुभ दिपावली. या फोटोत त्यांचा नवरा समीर आठल्ये, थोरली मुलगी ईशानी आणि धाकटी मुलगी कस्तुरी पाहायला मिळत आहे.

तसेच दुसऱ्या फोटोत या सर्वांसोबत ईशानीचा नवरादेखील पाहायला मिळतो आहे.

अलका कुबल आणि समीर आठल्ये यांचे लव्ह मॅरेज आहे. समीर आठल्ये हे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आहेत.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे दोघांची पहिली भेट झाली आणि मैत्री झाली तिथूनच दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. त्यानंतर दोघांनीही लग्न करत सुखी संसाराला सुरुवात केली.

अलका कुबल यांच्या थोरली लेक ईशानीचे लग्न नुकतेच पार पडले. या लग्न सोहळ्याचे फोटो खूप व्हायरल झाले होते. ईशानी ही पायलट असून तिला लहानपणापासून वैमानिक व्हायचं होते.

तर अलका कुबल यांची धाकटी लेक कस्तुरी परदेशात डर्मेटॉलॉजिस्टचे शिक्षण घेते आहे. आलका कुबल यांच्या दोन्ही लेकी सिनेइंडस्ट्रीऐवजी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत.