तिच्या गाण्यांवर थिरकता थिरकता तीच तिची प्रेरणा बनली आणि अमृता खानविलकरने ‘तो’ निर्णय घेतला!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 08:00 AM2021-11-23T08:00:00+5:302021-11-23T08:00:02+5:30

Amruta Khanvilkar Birthday Special : ‘वाजले की बारा’ म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. आज तिचा वाढदिवस.

‘वाजले की बारा’ म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. आज तिचा वाढदिवस.

23 नोव्हेंबर 1984 रोजी पुण्यात जन्मलेल्या अमृताने 2004 साली ‘इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज ’या कार्यक्रमात भाग घेतला, तिसरा क्रमांक पटकवला आणि सिनेसृष्टीतील तिचा प्रवास सुर झाला.

माधुरी दीक्षित ही अमृताची रोल मॉडेल. अभिनय क्षेत्रात येण्यासाठी तिच्याकडूनच अमृताला प्रेरणा मिळाली होती. खुद्द अमृताने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

लहानपणी अमृताच्या कॉलनीत गणेशोत्सवात किंवा इतर कार्यक्रमांना मला माधुरी दीक्षितच्या गाण्यांवर डान्स करायला तिला अतिशय आवडत असे. हीच माधुरी पुढे अमृताची रोल मॉडेल बनली.

अमृता खानविलकर जशी उत्तम अभिनेत्री आहे तसाच ती सुंदर डान्सही करते. तिने अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही केलं आहे.

नच बलिये, एकापेक्षा एक अशा शोमधून तिने आपल्या डान्सचा जलवा दाखवला आहे. तर कॉमेडी एक्स्प्रेस, बॉलिवूड टूनाईट या कार्यक्रमांचं तिने सूत्रसंचालन केलं.

गोलमाल, साडे माडे तीन, दोघात तिसरा आता सगळं विसरा, अर्जून, झकास, धूसर, सतरंगी रे, शाळा, आयना का बायना, बाजी, कट्यार काळजात घुसली यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये तिने उत्तम अभिनय केला आहे.

राझी, फूंक, या हिंदी चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत. खतरो कें खिलाडी या शोमध्येही ती सहभागी झाली होती.

अमृता खानविलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. तिचे वेगवेगळे फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

फिटनेसच्या बाबतीत अमृता अतिशय जागृक आहे. योग्य डाएट आणि व्यायामावर ती भर देते.