Photos: गुलाबी हाय स्लिट ड्रेस, सिल्व्हर ज्वेलरी; अंबानींच्या रिसेप्शनसाठी अमृताचा खास लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 04:06 PM2024-07-15T16:06:58+5:302024-07-15T16:19:22+5:30

बॉलिवूड कलाकारांच्या मांदियाळीत मराठमोळ्या अमृताची एन्ट्री

अंबानी वेडिंग यावर्षीचा सर्वात चर्चेतला मुद्दा आहे. आधी प्री वेडिंग आणि आता ग्रँड वेडिंगमुळे ते चर्चेत राहिले. या लग्नाला कोण कोण आलं आणि कोण नाही याचीही तेवढीच चर्चा झाली.

सर्व बॉलिवूड, हॉलिवूड कलाकारांच्या मांदियाळीत काही मराठी सेलिब्रिटींनाही अनंत अंबानी आणि राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनचं आमंत्रण मिळालं. त्यातच होती सर्वांची लाडकी अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar).

अमृताने अंबानींच्या रिसेप्शनला हजेरी लावली. तिच्या खास लूक्सचे फोटो तिने शेअर केले आहेत. गुलाबी रंगाच्या आऊटफिटमध्ये अमृता अप्सरेपेक्षा कमी दिसत नाही.

अमृताने गुलाबी रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला आहे. डीपनेक ब्लाऊज आणि हाय स्लिट ड्रेसने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.

यासोबतच तिने सुंदर डायमंड-सिल्व्हरने चमचमता असा सुंदर नेकलेस परिधान केला आहे. तसंच हातात नाजूक सिल्व्हर ब्रेसलेट आणि कपाळावर बिंदीही आहे. तिच्या बोटातील शायनिंग अंगठीनेही लक्ष वेधून घेतलंय.

केसांचा बन बांधून तिने लूक पूर्ण केला आहे. तसंच तिचा मेकअपही ऑन पॉइंट आहे. तिच्या डोळ्यांचा रंगही अगदी उठून दिसत आहे.

'For the अr wedding' असं कॅप्शन तिने दिलं आहे. अमृताने इन्स्टाग्रामवर फोटोशूट शेअर केलं आहे. यावर चाहत्यांनी कमेंट करत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केलाय.