Photos: अमृता खानविलकरचा साजिरा श्रृंगार! पारंपरिक फोटो पाहून खिळल्या चाहत्यांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 15:39 IST2024-12-24T14:38:29+5:302024-12-24T15:39:38+5:30

अमृता खानविलकरच्या सौंदर्याचं कौतुक करावं तितकं कमीच...बघा Photos

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आपल्या सौंदर्याने कायम चाहत्यांना घायाळ करते. नुकतीच तिने 'संगीत मानापमान' सिनेमाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली.

ट्रेलर लाँचसाठी अमृताने खास पिवळ्या रंगाची काठापदराची साडी नेसली. यात तिचा लूक अगदी तिच्या 'चंद्रमुखी'मधील लूकचीच आठवण करुन देणारा होता.

पिवळ्या साडीवर तिने घातलेले भरजरी मोत्याचे दागिनेही विशेष आकर्षण निर्माण करणारे दिसत आहेत. तिच्या गळ्यातील सुंदर हार, मॅचिंग कानातले, हातात बांगड्या, मोठी अंगठी आणि सुंदर बटवा असं तिने छान कॅरी केलेलं दिसत आहे.

साडीचा ब्लाऊजही खूपच खास आहे. मागून डीप नेक आणि त्याच रंगाचा गोंडा बांधला आहे. खास आकर्षण म्हणजे पिवळ्या ब्लाऊजच्या स्लीव्हवर सुंदर डिझाईन आहे.

तिची सुंदर हेअरस्टाईलही लक्ष वेधून घेत आहे. तसंच ऑन पॉइंट मेकअप केलेला आहे. यामुळे तिच्या चेहऱ्यावर आणखी ग्लो आला आहे.

अमृता या पारंपरिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे. या लूकमध्ये अनेक पोज देत तिने फोटोशूट केलं आहे.

अमृता नुकतीच 'लाईक आणि सबस्क्राईब' या मराठी सिनेमात दिसली. सोबतच ती हिंदीतही सक्रीय आहे. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.