चंद्रानं कलरफुल साडीतील सौंदर्यानं चाहत्यांना केलं घायाळ, पाहा अमृता खानविलकरचे लेटेस्ट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 13:49 IST2022-06-29T13:38:35+5:302022-06-29T13:49:41+5:30

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरने नुकतेच साडीत फोटोशूट केले आहे. या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येते आहे.

अमृता खानविलकरचा नुकताच चंद्रमुखी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यात तिने साकारलेली चंद्रा प्रेक्षकांना खूप भावली.

अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

नुकतेच अमृता खानविलकरने कलरफुल साडीत फोटोशूट केले आहे. काळ्या रंगाच्या साडीवर वेगवेगळ्या रंगाची मोठी फुले पाहायला मिळत आहेत.

या फोटोशूटमध्ये अमृता खूपच सुंदर दिसते आहे.

अमृताने साडीत वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केले आहे.

अमृता खानविलकरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

अमृता खानविलकरचा चंद्रमुखी फिव्हर अद्याप चाहत्यांवर कायम आहे.