Girija Oak ३२५ प्रकारचे गोड पदार्थ! अनंत-राधिकाच्या लग्नात पैठणी नेसलेली गिरीजा म्हणते- "आता रसगुल्ला खाऊ की..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 10:56 AM2024-07-15T10:56:58+5:302024-07-15T12:15:47+5:30

Girija Oak अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीत अभिनेत्री गिरिजा ओकही सहभागी झाली होती. यावेळी गिरिजाच्या मराठमोळ्या अंदाजाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली.

Anant Ambani Radhika Merchant Wedding : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला.

बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींबरोबरच अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनला मराठी कलाकारांनीही हजेरी लावली होती.

अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीत अभिनेत्री गिरिजा ओकही सहभागी झाली होती. यावेळी गिरिजाच्या मराठमोळ्या अंदाजाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली.

जांभळ्या रंगाची पैठणी आणि लांब बाह्यांचा ब्लाऊज घालून गिरिजाने मराठमोळा लूक केला होता.

केसांत गजरा माळून आणि खड्यांच्या ज्वेलरीत अतिशय साधा मेकअप करूनही गिरिजाचं सौंदर्य खुलून आलं होतं.

अनंत-राधिकाच्या रिसेप्शन पार्टीतील बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या झगमगत्या सिताऱ्यांमध्ये गिरिजाने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

याचे फोटो शेअर करत गिरिजाने "अजून एक रसगुल्ला खाऊ की नको...३२५ प्रकारचे गोड पदार्थ..."असं कॅप्शन दिलं आहे.

गिरिजाबरोबरच अभिनेत्री अमृता खानविलकरनेदेखील या वेडिंग रिसेप्शनला हजेरी लावली होती.