अतुल कुलकर्णीसाठी ही एक गोष्ट होती खास, पण कुटुंबीयांना बसला होता धक्का By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 11:31 AM 2021-11-25T11:31:41+5:30 2021-11-25T11:40:17+5:30
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, या कवितेच्या ओळींप्रमाणे प्रत्येकाचं कुणावर तरी प्रेम असतं किंवा प्रत्येकाची काही ना काही प्रेमाची गोष्ट असते. अशीच काही तरी हटके प्रेमाची गोष्ट अभिनेता अतुल कुलकर्णी यांचीही आहे. मराठीसह हिंदी सिनेमात आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकणाऱ्या अतुल कुलकर्णी यांनी अभिनेत्री गीतांजलीसह लग्न केलं.या दोघांच्या प्रेमाची गोष्टही तितकीच हटके आहे.
१९९३ साली एनएसडीमध्ये अतुल आणि गीतांजली यांची भेट झाली. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २९ डिसेंबर १९९६ रोजी पुण्यात दोघं रेशीमगाठीत अडकले होते.
मात्र गीतांजली यांच्यासह ओळख होणं, मग मैत्री आणि त्याचं रुपांतर प्रेमात होणं हे सुखद आश्चर्याचा धक्का होता. असं अतुल कुलकर्णी यांनी टीव्हीवरील एका प्रसिद्ध चॅट शोमध्ये सांगितलं होतं.
स्वतःसाठीच नाही तर हा कुटुंबीयांसाठीही मोठा धक्का होता अशी कबूली अतुल कुलकर्णी यांनी दिली होती.
ॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेल्या अतुल यांना ‘हे राम’ आणि ‘चांदनी बार’ सिनेमातील भूमिकांसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय.
िविध भाषांमधून ६० पेक्षा जास्त सिनेमात काम केलेल्या अतुल यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. 'हे राम', 'चांदनी बार', 'खाकी', 'पेज ३', 'रंग दे बसंती', 'वळू', 'नटरंग', 'एका प्रेमाची गोष्ट' अशा सिनेमांमधून त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत
दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळते. त्यांचे हे नाते लग्नानंतर अजून घट्ट झाले असून दोघेही एकमेकांची तितकीच काळजी घेतात.