Birthday Special: Take a look at this photo of Sonali Kulkarni, fall in love with her TJL
Birthday Special: कधी अप्सरा तर कधी हिरकणी...! सोनाली कुलकर्णीचे एकदा पहा हे फोटो, पडाल तिच्या प्रेमात By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 02:17 PM2020-05-18T14:17:34+5:302020-05-18T14:35:37+5:30Join usJoin usNext सोनाली कुलकर्णीचे पहा हे स्टनिंग फोटो मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा आज 32वा वाढदिवस आहे. सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'नटरंग' या चित्रपटातून. या चित्रपटात तिने केलेले लावणीनृत्य प्रचंड गाजले. त्यातील 'अप्सरा आली' या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले. यानंतर तिने क्षणभर विश्रांती, अजिंठा(चित्रपट) आणि झपाटलेला 2 यांसारखे अनेक चित्रपट केले. सोनाली कुलकर्णी हिचा जन्म 18 मे 1988 रोजी पुण्यातील लष्करी छावणीमध्ये झाला. तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात 30 वर्षे काम केल आहे. तिची आई सविंदर ही पंजाबी असल्यामुळे तिच्या बोलण्यातून या भाषेचा ठेहराव दिसतो. सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालयात झाले असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले आहे. तिने पु्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पत्रकारिता विषयातील पदवी प्राप्त केली आहे. पुण्याच्याच इंदिरा स्कूल ऑफ मॅनेजमेंट ह्या संस्थेतून तिने पत्रकारितेमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सोनालीने मराठीसोबत हिंदी चित्रपटातही काम केले. ग्रँड मस्ती ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला व रितेश देशमुखच्या पत्नी ममताची भूमिका केली. याशिवाय सोनाली सिंघम रिटर्न्समध्येदेखील पाहुणी कलाकार म्हणून झळकली आहे. गाढवाचं लग्न, आबा झिंदाबाद, हाय काय नाय काय, समुद्र, सा सासूचा, इरादा पक्का, गोष्ट लग्नाची, क्षणभर विश्रांती, नटरंग, अजिंठा, झपाटलेला 2, रमा माधव, क्लासमेट्स, मितवा, शटर, पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, तुला कळणार नाही, हम्पी, ती आणि ती, हिरकणी, विकी वेलिंगकर या चित्रपटात सोनालीने काम केले आहे. तिचा काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेला हिरकणी चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतूक झाले होते. या चित्रपटात तिने हिरकणीची भूमिका साकारली होती.टॅग्स :सोनाली कुलकर्णीहिरकणीsonalee kulkarniHirkani Marathi Movie