Saie Tamhankar:काळ्या रंगाची साडी अन् लांब वेणी, मकर संक्रांतीनिमित्त सईचं खास फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 11:20 IST2025-01-14T11:13:46+5:302025-01-14T11:20:42+5:30
Saie Tamhankar : सई ताम्हणकरने मकर संक्रांतीनिमित्त पारंपारिक अंदाजात खास फोटोशूट केले आहे.

सई ताम्हणकर सातत्याने चर्चेत येत असते. कधी तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी फोटोशूटमुळे.
नुकतेच सई ताम्हणकर हिने मकर संक्रांतीनिमित्त फोटोशूट केलंय. या फोटोशूटमध्ये सईचा पारंपारिक अंदाज पाहायला मिळतोय.
सई ताम्हणकरने या फोटोशूटमध्ये काळ्या रंगाची साडी, कानात मोठे इअररिंग्स आणि केसांची लांब वेणी घातलीय.
या फोटोशूटमध्ये सईने काळा रंग लावलेल्या गुलाबांचा फोटोदेखील शेअर केला आहे.
सई ताम्हणकरचा हा पारंपारिक अंदाज चाहत्यांना खूपच भावतो आहे.
सई ताम्हणकर बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
सई ताम्हणकर शेवटची अग्नी या सिनेमात पाहायला मिळाली.