महेश मांजरेकरांच्या लेकीचं बोल्ड फोटोशूट, एकदा पाहाच गौरी इंगवलेचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 12:52 PM2024-07-26T12:52:46+5:302024-07-26T12:57:36+5:30

Gauri Ingwale: गौरी इंगवले सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतेच तिने बोल्ड फोटोशूट केलंय.

गौरी ही दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची मानसकन्या आहे.

गौरी इंगवले मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

गौरीला महेश मांजरेकरांनी एका डान्सिंग शोमध्ये पाहिले आणि तिला आपल्या कुटुंबात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ती त्यांच्यासोबत राहते.

नुकतेच गौरीने यॉटवर बोल्ड फोटोशूट केलंय. यात तिने नियॉन ग्रीन रंगाची ब्रालेट, त्यावर व्हाइट पॅण्ट आणि व्हाइट जॅकेट परिधान केलंय.

या गेटवर तिने केस मोकळे सोडले आहेत आणि गॉगल लावून लूक परिपूर्ण केलाय.

यात तिने यॉटवर एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

या फोटोशूटमध्ये गौरी खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.

गौरीच्या या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

गौरी शेवटची महेश मांजरेकर दिग्दर्शित अनोखी गाठ सिनेमात झळकली. यात तिच्यासोबत श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत होता.