मराठमोळ्या अभिनेत्याचा कान्स फेस्टिव्हलमध्ये स्वॅग! साध्या पण रुबाबदार लूकने जिंकली मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 11:58 AM2024-05-28T11:58:15+5:302024-05-28T12:28:21+5:30

Cannes Film Festival 2024 : बॉलिवूड नाही हा तर मराठमोळा अभिनेता! कान्स फेस्टिव्हलमधील रुबाबदार लूकची होतेय चर्चा

सध्या जिकडेतिकडे कान्स फिल्म फेस्टिव्हलची चर्चा होत आहे. यंदाचा कान्स फिल्म फेस्टिव्हल मराठी सिनेसृष्टीसाठी खास ठरला आहे.

मराठमोळ्या छाया कदम यांनी कान्स फेस्टिव्हल गाजवलं. आईची साडी आणि नथ असा पेहराव करून त्या रेड कार्पेटवर उतरल्या.

आता चर्चा होतेय ती एका मराठी अभिनेत्याची...अभिनेता रोहित कोकाटेची भूमिका असलेला 'द शेमलेस' हा चित्रपट कान्स फेस्टिव्हलसाठी निवडला गेला.

त्यासाठी रोहितने कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. कान्सच्या रेड कार्पेटवर रोहितचा रूबाबदार लूक पाहायला मिळाला.

ब्लेझर लूकमध्ये रोहितने कान्स फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. रेड कार्पेटवर त्याचा स्वॅग पाहायला मिळाला.

कान्स फेस्टिव्हलमधल्या रोहितच्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

रोहितच्या साध्या पण रुबाबदार लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.