'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा अन् तोही मराठी; तुम्ही पाहिलाय?

By देवेंद्र जाधव | Updated: February 25, 2025 17:39 IST2025-02-25T16:44:09+5:302025-02-25T17:39:35+5:30

'छावा' सिनेमा गाजवणारे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची सुरुवात एका मराठी सिनेमापासून झाली होती. हा सिनेमा चांगलाच नावाजला गेला (laxman utekar, chhaava)

सध्या 'छावा' सिनेमामुळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर चांगलेच चर्चेत आहेत. लक्ष्मण उतेकरांनी 'छावा' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडला ब्लॉकबस्टर सिनेमा दिला

छत्रपती संभाजी महाराजांची कहाणी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी मोठ्या पडद्यावर साकार केली. अनेकांना माहित नसेल की दिग्दर्शक म्हणून लक्ष्मण उतेकरांनी मराठी सिनेमातून सुरुवात केलेली

या सिनेमाचं नाव 'टपाल'. २०१४ साली 'टपाल' हा सिनेमा रिलीज झाला होता. लक्ष्मण उतेकरांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं

'टपाल'मध्ये पोस्टमास्तर आणि त्याच्या पत्नीच्या भावुक कहाणी दिसते. या दोघांच्याही पदरात मुल नसतं. अशातच त्यांना गावातील खोडकर मुलगा रंग्याचा लळा लागतो

रंग्याचं त्याच्या शाळेतील एका मुलीवर प्रेम जडल्याने तो तिच्या घरी पत्र पाठवतो. पण पुढे हे पत्र त्या मुलीला मिळू नये म्हणून रंग्या पोस्टमास्तरांना भेटतो.

नंतर रंग्याला घेऊन पोस्टमास्तर आणि त्याची पत्नी गावातील तालुक्यात जातात. दुसरीकडे गावात अशी अफवा उठते की निपुत्रिक पोस्टमास्तर आणि त्याच्या पत्नीने रंग्याचं अपहरण केलं. मग पुढे काय होतं याची भावुक कहाणी 'टपाल'मधून दिसते.

नंदू माधव, वीणा जामकर या दोन कलाकारांनी 'टपाल' सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. प्रेक्षक अन् समीक्षकांनी नावाजलेला उतेकरांचा हा सिनेमा तुम्ही ZEE 5 वर पाहू शकता.