सांवले रंग का सुरूर है..! रिंकू राजगुरूच्या साडीत मनमोहक अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 01:18 PM2024-07-02T13:18:21+5:302024-07-02T13:29:45+5:30

अभिनेत्री रिंकू राजगुरूने काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय.

अभिनेत्री रिंकू राजगुरू सतत चर्चेत येत असते. कधी आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी फोटोशूटमुळे.

नुकतेच रिंकू राजगुरूने काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.

काळ्या रंगाच्या साडीवर सिल्व्हर ऑक्साइडची ज्वेलरी परिधान करून रिंकूने छान पोझ दिल्या आहेत.

रिंकूच्या या साडीतल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे. तिला साडी फार आवडते. त्यामुळे बऱ्याचदा ती साडीत फोटोशूट करताना दिसते.

रिंकू राजगुरूच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

रिंकू राजगुरू शेवटची झिम्मा २ चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं.

रिंकू बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.