या मराठमोळ्या अभिनत्रींनी आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी बांधली लग्नगाठ, आज करताहेत सुखाने संसार By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 06:00 AM 2023-04-22T06:00:00+5:30 2023-04-22T10:18:11+5:30
अनेकदा कलाकार सिनेसृष्टीत काम करताना आपल्या सहकलाकारांच्या प्रेमात पडतात आणि त्यांच्याशी लग्न करतात. एखाद्या अभिनेत्रीने अरेंज मॅरेज केल्याचे आपण क्वचितच ऐकतो. पण मराठी कलाविश्वात अशा काही अभिनेत्री आहे आहेत ज्यांनी आई-वडिलांच्या संपतीच्या मुलाशी लग्न केलंय आणि आज त्या सुखाने संसार करतायेत. मृण्मयी देशपांडे- या यादीतील पहिलं नाव आहे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे. मलिका आणि चित्रपटांमधे दमदार भूमिका साकारत प्रेक्षाकांच्या मनाच स्थान निर्माण करणाऱ्या मृण्मयीने 3 डिसेंबर 2016 रोजी स्वप्नील रावशी लग्नगाठ बांधली, मृण्मयीच्या कुटुंबानी वधू-वर सूचक मंडळात तिचं नाव नोंदवले होते. (फोटो इन्स्टाग्राम)
स्वप्नीलच्या वडिलांनी जेव्हा मृण्मयीला पाहिलं तेव्हा त्यांनी ती सून म्हणून आवडली होती. म्हणून त्यांनी मुलाला मृण्मयीला भेटण्याचा आग्रह केला. काही भेटीनंतर मृण्मयी आणि स्वप्निला एकमेकांचे स्वभाव आवडू लागेल अखेर त्यांनी घरच्यांच्या संमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज दोघांचा सुखाचा संसार सुरु आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
प्रार्थना बेहेरे- कॉफी आणि बरच कही, मिस्टर आणि मिसेस सदाचारी, मितवा, पवित्रा रिश्ता, माझी तुझी रेशीमगाठ सारख्या कलाकृतींमधून आपल्या अभिनयाने रसिकांची मानं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. प्राथनाने तिच्या फॅन्सना धक्का दिला जेव्हा तिने 2017मध्ये अभिषेक जावकरशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. (फोटो इन्स्टाग्राम)
प्रार्थनाच्या घरी अभिषेकच स्थळ तिचा एक कुटुंब मित्राने आणले होते. फोनवर बोलणं झाल्यांतर आणि काही भेटीगाठीनंतर प्रार्थनाने अभिषेकसोबत लग्नाचा निर्णय घेतला. २०१७मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. प्रार्थना तिची मॅरिड लाईफ एन्जॉय करते आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
मृणाल दुसानिस- माझिया प्रियाला प्रीत कळेना या लोकप्रिय मलिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस. अल्पावधीतच लोकप्रियता मिळल्यावर अभिनेत्री जेव्हा आचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांना धक्का बसला. काही मोजक्याच मलिकांमध्ये काम केल्यानंतर मृणालने अभिनय क्षेत्राला रामराम केला आणी संसारात रमली.
2016 मध्ये मृणालने निरज मोरेशी लग्नगाठ बांधली, निरज सॉफ्टवेअर इंजिनर असुन तो आधीपासूनच अमेरिकत स्थायिक आहे. एक फॅमिली फ्रेंडने दोघांचा परिचय करुन दिला. दोघांमध्ये काहीवेळा फोनवरुन बोलणं झालं त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मृणाल दुसानिस गेल्या तीन वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहे. पती नीरज मोरे आणि मुलगी नुर्वीसह आनंदात आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
रूपल नंद - 'गोठ', 'श्रीमंताघरची सून' या मालिका आणि 'मुंबई पुणे मुंबई ३' या सिनेमातून अभिनेत्री म्हणून लोकप्रिय झालेली रूपल नंद नुकतीच लग्नबंधनात अडकली. मुंबईच्या अनिश कानविंदे याच्याशी तिने लग्नगाठ बांधली. एका matrimonial site मधून रूपलचा आईने अनिश कानविंदेला पसंत केलं. (फोटो इन्स्टाग्राम)
अनिश शिपवर नोकरीला असल्याने सुरुवातील रुपल आणि अनिशच्या आईने एकेमकांशी भेट घेतली, त्यानंतर रूपलने पसंती दर्शवल्यानंतर अनिशला याबाबत सांगितले गेले, अनिश शिपवरच असल्याने सुरुवातील मेसेजवरच या दोघांचा बोलणं झाला. त्यानंतर २-३ महिने फोनेवरच संवाद झाल्यानंतर अखेर काही महिन्यातच या दोघांनी लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. (फोटो इन्स्टाग्राम)
माधुरी दीक्षित -आपल्या दिलखेचक अदांनी,एक काळ बॉलिवूड गाजवणारी धक धक गर्ल माधुरी दीक्षित. ८० आणि ९०च्या दशकात आपल्या करियरचा पीकवर असताना माधुरीने लग्न करत चाहत्यांना धक्का दिला. माधुरीने अमेरिका स्थित श्रीराम नेने यांच्यासोबत लग्नगाठ बांधली, विशेष लाखो हृदयाना धडकन असणाऱ्या माधुरीने चक्क अरेंज मॅरेजचा मार्ग निवडला.(फोटो इन्स्टाग्राम)
माधुरी लॉस एंजेलिसला तिचा भावाला भेटायला गेली असता तिथे तिची भेट श्रीराम नेनेसोबत झालो झाली. तेव्हा नेने यांना माधुरी ही बॉलिवूडची स्टार अभिनेत्री आहे याबद्दल किंचितही माहिती नव्हती. यानंतर त्यांच्या भेटी-गाठी होत गेल्या आणि एकमेकानांचं स्वभाव त्यांना आवडू लागला आणि अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.(फोटो इन्स्टाग्राम)